सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दिनांक 14 जुलै ते 18 जुलै 2025 या एकाच आठवड्यासाठी दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभ्यागतांना भेटणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर येथील नियोजनात व्यस्त असल्याने प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार रोजीच्या अभ्यागतांच्या भेटी रद्द करण्यात आलेल्या होत्या. तरी दिनांक 14 ते 18 जुलै या कालावधीत दररोज ते नागरिकांना भेटणार आहेत.