पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हील विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पिलीव, ता.माळशिरस येथील कु.कोमल संजय गलांडे हिची ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हील इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कु.कोमल संजय गलांडे हिची पायेनियर फाउंडेशन इंजिनियरींग प्रा.लि. (वार्षिक पॅकेज ३ लाख ), ट्र रियालिटी, मुंबई (वार्षिक पॅकेज ३.२५ लाख ), भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन प्रा.लि., पुणे (वार्षिक पॅकेज ३ लाख ) येथे कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून तीला वार्षिक पॅकेज ३ लाख मिळालेले आहे. भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन प्रा.लि., पुणे कंपनीत कोमल ही जानेवारी 2025 मध्ये रुजू झाली आहे.
भाटे आणि राजे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ही औद्योगिक, व्यावसायिक, आयटी पार्क, संस्थात्मक प्रकल्प क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. भाटे आणि राजे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून या कंपनीची स्थापना १९९० मध्ये झाली आहे. सध्या १००० पेक्षा जास्त स्थापत्य अभियंते या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी अत्याधूनिक प्रिकास्ट उत्पादन आणि बांधकाम तंत्राच्या क्षेत्रात अग्रेसर आहे.
कोमल हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.