इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
एकात्मिक बालविकास सेवा योजना इंदापूर, प्रकल्प 2 अंतर्गत निर्वांगी - निमसाखर बीट मध्ये आरंभ बालक पालक मेळावा आयोजित केला गेला. जन्मतः प्रत्येक बालकाची वाढ व विकासाची क्षमता ही वेगवेगळी असते व ही क्षमता वाढावी याकरता पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो सुरुवातीच्या काळात बालकांची निगा कशी घेतली गेली याचाही परिणाम बालकांच्या वाढ व विकासावर होत असतो निगा राखणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेल्या प्रत्येक काही वर्षातील अनुभवांचा परिणाम बालक कशा प्रकारची व्यक्ती होईल यावर होत असतो बालकाच्या विकासासाठी कुटुंबाकडून प्रेम स्नेह व आपुलकी पेरणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे बालकाच्या वाढ व विकासामध्ये भर पडते व बालके सुदृढ राहतात बालके अगदी कमी वयातच पुढील आयुष्याच आवश्यक अशी कौशल्य आत्मसात करतात बालकाच्या मेंदूची वाढ गर्भधारणेपासून सुरुवातीच्या तीन वर्षात अतिशय झपाट्याने होत असते.
बालके जन्मल्याबरोबर पाहू ऐकू शकतात ती अगदी लहान असल्यापासून त्यांना त्यांच्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग करण्याच्या संधीची गरज असते त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी बालकांना हालचाल तसेच स्पर्श करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू इतरांसोबत खेळण्याची आवश्यकता असते या सर्व अनुभवामुळे बालकाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळते. अशावेळी पालकांना जागृत केले तरच घरोघरी सुदृढ सशक्त आणि बुद्धिमान बालके जन्माला येतील या उद्देशाने आज निमसाखर ग्रामपंचायत मध्ये बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यामध्ये शंभर ते दीडशे महिलांनी सहभाग नोंदवला या मेळाव्यादरम्यान आलेल्या महिला व बालकांना बालकांच्या वाढ व विकासाविषयी मार्गदर्शन केले गेले मुलांच्या वाढीसाठी विकासासाठी आवश्यक समाजाचे कुटुंबाचे वातावरण कसे मुलांवर परिणामकारक ठरते त्यानुसार पालकांची नेमकी जबाबदारी काय याबाबत विविध स्टॉल मार्फत जाणीव जागृती करण्यात आली. कमी खर्चात जास्त पौष्टिक पदार्थांचं प्रदर्शन मांडण्यात आलं .मजेचा बोगदा, बटरफ्लाय सेल्फी ,साप शिडी, विविध वेगवेगळ्या कला कौशल्य मधून ,विज्ञाना अनुभवांमधून मजेच्या खेळांमधून मुलांच्या वाढ व विकासाच्या प्रात्यक्षिक अंगणवाडी सेविकांमार्फत पालकांना दाखवण्यात आले. भविष्याच्या झाडाच्या माध्यमातून मुलांच्या भवितव्यासाठी पालकांना मेंदूचे जाळे कशाप्रकारे दाट करून मुलांचा बुद्ध्यांक वाढवता येऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रणगांव दगडवाडी कळम निर्वांगी व निमसाखर या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत च्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पर्यवेक्षिका शुभांगी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन केले होते. निमसाखर ग्रामपंचायत यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.