सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "ड्रग इंटरेक्शन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.
या कार्यशाळेत चंद्रपूर येथील हाय-टेक काॅलेज ऑफ फार्मसी मधील डॉ. एन. ए. शेख प्रमुख वक्ता म्हणून लाभले होते. यादरम्यान मार्गदर्शन करताना डाॅ. शेख म्हणाले, जेव्हा दोन किंवा अधिक औषधं एकत्र घेतली जातात, तेव्हा ती एकमेकांवर परिणाम करतात आणि त्यामुळे औषधांचा प्रभाव वाढू, कमी होऊ, किंवा अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतात. यालाच "ड्रग इंटरेक्शन" म्हणतात. ड्रग-ड्रग इंटरेक्शन, ड्रग फुड, ड्रग अल्कोहोल इंटरेक्शन, ड्रग डिसाईस इंटरेक्शन आदी विषयांवर सखोल माहिती दिली.
याशिवाय औषधाची सुरुवात करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषध घेताना आहार व पेय पदार्थांबद्दल विचार करा, फार्मासिस्टचा सल्ला घ्या असे मत डाॅ. शेख यांनी यादरम्यान व्यक्त केले.
हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. नीलवर्मा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.