पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "FAREWELL-2K25" या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.
हा कार्यक्रम 21 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता इलेक्ट्रिकल सेमिनार हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या चार वर्षांच्या महाविद्यालयीन प्रवासासाठी शुभेच्छा देणे व त्यांच्या आठवणींना उजाळा देणे हे होते.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. पी. बी. व्यवहारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी महाविद्यायलयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी व विद्युत विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-संगीत आणि मैत्रीच्या गप्पांनी संपूर्ण वातावरण आनंददायी झाले होते. "FAREWELL-2K25" हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरला. तसेच हया कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्युत विभागातील अंतिम वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून तेजस कुलकर्णी यास गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.