पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे सोनके ता.पंढरपुर येथे ATM चोरीची घटना घडली होती.
त्यावेळी पोलीसांना मदत करणारे इसम - सर्जेराव दगडु मासाळ रा. सोनके यांचा आज दि.10/04/2025 रोजी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे येथे IPS अंजना कृष्णा व्हि.एस. प्रभारी अधिकारी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सत्कार केला .पोलिसांना वेळेवर मदत केल्यामुळे पोलिसाना योग्य ती कारवाई करता आली. सर्जेराव मासाळ यांनी पोलिसांना माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
यावेळी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.