पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार स्वप्निल जमदाडे यांना प्रदान करण्यासाठी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेे अनिल सावंत, शिवसेनेचे महेश साठे व स्वेरीचे कॉलेज चे संस्थापक डॉ. बी पी रोंगे , माजी नगराध्यक्ष नागेश भोसले,माजी उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे ,नगरसेवक व विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे संस्थापक डीजे सर्वगोड , अनिल ननवरे ,यावेळी वडील कुटुंबातील हणमंतराव जमदाडे व नंदकुमार लोखंडे उपस्थित होते.
स्वप्निल जमदाडे यांनी आयुष्य जगताना हे पुस्तक अतिशय लहान,तरुण व वयोवृद्ध यांना आयुष्यात कसं जगायचं यासाठी उपयोगाच आहे व तसेच जवळपास 25 कविता पूर्ण झाल्या आहेत ,त्यांची गो कोरोनो कवितेतून समाजात कोरोना काळात जनजागृती करण्यात आली होती. अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते म्हणून त्यांचा 400 प्रस्ताव आले होते, त्यातून त्यांची निवड करण्यात आली होती.