पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. प्रसंगी वेळोवेळी अपमान सहन करुनही आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. देशप्रेमापुढे त्यांनी स्वत:च्या विश्रांतीचा त्याग करुन अहोरात्र कष्ट केले, त्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकविले अशा या ता-यांच नांव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर l अशा या थोर भारतीय संविधानाचे शिल्पकारास विनम्र अभिवादन l….
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना संजय बनकर, सिध्देश्वर लवटे, सुनिल ढोपे, अविनाश वाघमारे, संदीप माळी तसेच सिक्युरिटी अमोल वाघमारे, सुनिल बुंरुगले, विशाल गांवधरे उपस्थित होते.