सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील बसवसेंटर संस्थेच्यावतीने बसवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले असून निबंध फुलस्केप कागदावर समास सोडून सुवाच्य अक्षरात लिहून अथवा डिटीपी करुन खाली दिलेल्या पत्त्यावर पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर सह आणून द्यावेत!प्रत्येक गटातील तीन यशस्वी स्पर्धकांस रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येईल!परिक्षकांचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कुठलीही तक्रार चालणार नाही!दिलेले निबंध परत मिळणार नाहीत!निबंध प्रौढ महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी या दोन गटात असून विषय पुढील प्रमाणे----
गट क्रमांक 1श्री शिवयोगी सिद्धारामांचे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्य (600शब्दापर्यंत)
गट क्रमांक 2श्री शिवयोगी सिद्धारामांची दहा वचने भावार्थसह (500शब्दापर्यंत)
सर्व समाजातील महिला व विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभागी होऊन निबंध 29 एप्रिल 2025पर्यंत आणून द्यावेत असे आवाहन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यानी केले आहे!
पत्ता--39 बुधवार पेठ लिंगशेट्टी मंगल कार्यालय [ कस्तुरबा मार्केट समोर]सोलापूर!
संपर्क--8766572009