भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री भवानी मंदिर येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य संभाजी राजे शिंदे व पंचायत समितीचे अधिकारी अटकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की भवानी देवीच्या मंदिरात जाणाऱ्या सर्व भागातील रस्त्याचे डांबरीकरण लवकरच करण्यात येणार आहे.तसेच या भागातील शेती सह घरगुती वीज ग्राहकांना वीज वितरणची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भागाचा कायापालट करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी रामचंद्र सावंत म्हणाले की या मंदिर परिसरात असणारे बरेच प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी संभाजी राजे यांनी सोडविल्या आहेत. या भागातील रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.अनेक दिवसाची विहिरीची मागणी पण यावेळी पूर्ण झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी पंचायत समितीचे अधिकारी अटकळे यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भवानी देवी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व मंदिर परिसरातील सर्व ग्रामस्थ व नागरिक व भाळवणी गावातील सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.