भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
कु. अर्पिता अमोल शिंदे इयत्ता 3 री या विद्यार्थिनीच्या, वाढदिवसानिमित्त तीचे पालक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गणपत शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी (मुली) यांना 12 खुर्चीचा सेट ₹ 11500 रुपये किमतीची भेटवस्तू रूपात देऊन अगळावेगळा वाढदिवस साजरा केला.
याचबरोबर सर्व मुलांना कांदापोहे, बिस्किट्पुडे, वहया वाटप केले. मुलामुलींच्या चेहयावर एक वेगळाच आनंद दिसत होता. यावेळी भाळवणी गावचे प्रथम नागरिक सरपंच रणजीत जाधव, शाळेच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे उद्योजक विजय (दादा) शिंदे यांनी यांनी कु. अर्पितास केक भरवून तिला शुभेच्छा दिल्या अध्यक्ष (पालक) अमोल गणप्त शिंदे यांचा यावेळी शाळेच्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक पालक, केंद्राच्या केंद्रप्रमुख शारदा रासकर , दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.