पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे रविवार दिनांक 27 /4 /2025 रोजी सकाळी 9 वाजता ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पशुवैद्यक दिन साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याता डॉ. व्हेट्रिना हेल्थ केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश घाडीगावकर हे किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी पशुवैद्यकापुढील आव्हाने या विषयावर तर जिओ प्लॅटफॉर्म मुंबईचे जनरल मॅनेजर डॉ. संतोष वाघचौरे कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी वापर या विषयावर व्याख्यान देणार आहेत. अशी माहिती पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी दिली आहे.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पशुसंवर्धन विभागाचे मा. सह आयुक्त डॉ. महेश बनसोडे , पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. शितल कुमार मुकणे, स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. बीपी रोंगे, पशुसंवर्धन पुणे विभागाचे आयुक्त डॉ. समीर बोरकर, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पशुसंवर्धन माजी सहसंचालक डॉ. सी आर कापडी, पुणे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार सातारा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सोलापूर पशुसंवर्धन प्रभारी उपायुक्त डॉ. विशाल येवले, सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, सांगली सह आयुक्त डॉक्टर विजय डोके सोलापूर सह आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रायोजक पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विलास डोईफोडे ,पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रियांका जाधव कोळेकर, महाव्हेट सोलापूरचे अध्यक्ष डॉ. शहाजी ठवरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. टी एन बेले व सचिव डॉ. अनिल सरदेशमुख यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने पशुसंवर्धन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.