पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. ०२ एप्रिल ते ०३ एप्रिल २०२५ या दोन दिवसीय औद्योगिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्याचा सदर विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे.
‘इंडस्ट्रीयल व्हिजीट’ हा अभियांत्रिकी शिक्षणातील एक महत्त्वाचा भाग असून या अभ्यास दौऱ्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. इंडस्ट्रीयल व्हिजीट म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कंपनी/कारखान्यात जाऊन तेथील कामकाज पद्धती जाणून घेणे. या व्हिजीटमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांबद्दल माहिती मिळते आणि त्यांना प्रेरणा मिळते. इंडस्ट्रीयल व्हिजीटमध्ये विद्यार्थ्यांना कारखान्यात चालणारी कार्यप्रणाली पाहण्याची संधी मिळते. इंडस्ट्रीयल व्हिजीटमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळते आणि त्यांना त्यांचे शैक्षणिक कार्य अधिक गतीने करण्यासाठी प्रेरणा मिळते तसेच उद्योगांबद्दल अद्ययावत माहिती मिळते.
या विद्यार्थ्यांनी बांधकामाच्या दृष्टीने सिव्हिल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असलेले प्राचीन स्थापत्य शास्त्र, धार्मिक स्थळांच्या वास्तु, शिल्प, घनकचरा व्यवस्थापन, तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग यांची माहिती घेतली. नाशिक वेष्ट मॅनेजमेंट प्लांट (एन.डब्ल्यु. एम. पी.) विपासना रिसर्च सेंटर, पांडव लेणी, त्र्यंबकेश्वर आणि हरिश्चंद्रगढ या ठिकाणी ही त्यांनी भेटी दिल्या. नाशिक वेष्ट मॅनेजमेंट प्लांट येथे तांत्रिक अधिकारी संजय बोरसे यांनी घनकचरा व्यवस्थापन कसे करावे यावर तर विपासना रिसर्च सेंटरमधील अधिकारी अशोक राजगोड यांनी स्ट्रक्चर बाबत सखोल माहिती दिली.
सदरचा औद्योगिक अभ्यास दौरा हा स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार व प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या सहकार्याने व विभागप्रमुख प्रा. ए.एच.कलुबर्मे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये ६५ विद्यार्थ्यांसह प्रा. ए.जी. इंगळे, प्रा. ए. एन.शिंदे, आणि प्रा. आर.एम. पावले यांनी सहभाग घेतला.