एकूण 157000 हजार रुपये रोख रक्कम व 18 हजार रुपयाची अवैध दारू असा एकूण175000 रुपयाचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर दिनांक पाच मार्च 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खर्डी या ठिकाणी पप्पू अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे अवैध जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आयपीएस श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले पीएसआय विक्रम वडणे पीएसआय पाटील पीएसआय संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हवालदार मंगेश रोकडे दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे पोलीस कॉन्स्टेबल तात्या गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने खर्डी येथील अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रेड केली असता एकूण 20 आरोपी अवैधरित्या पैशावर जुगार खेळत असताना मिळून आल्याने सदर जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असताना एकूण 157000 रोख रक्कम मिळून आल्याने पंचाच्या समक्ष पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली आहे.
तसेच सदर ठिकाणी झेडती घेतली असता अवैधरित्या बाळगलेली एकूण 18 हजार रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आल्याने एकूण 175000 रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला असून अवैध जुगार अड्डा चालवणारा इसम पप्पू अभंगराव व इतर 19 जनाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4आणी 5व मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आयपीएस श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पीएसआय भारत भोसले पीएसआय विक्रम वाढणे पीएसआय पाटील पीएसआय संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील एएसआय दत्तात्रय तोंडले पीएसआय विजू गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्या गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने केली आहे.