नादब्रह्म कला फाऊंडेशन यांचे वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षाप्रमाणे श्री नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब आणि श्रीराम प्रतिष्ठान करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या श्रीराम संगीत महोत्सवाची सुरुवात प्रियांका क्षीरसागर यांच्या सुरेल अविष्काराने संपन्न झाली.सुरुवातीला रामदास नाना रोंगे.रामहरी सुतार.साखरे सर.नुतन उपसरपंच ज्योती शिंगटे.सारिका पुरवत, कल्पना देशमुख आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे आणि कलाकार यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रियांका क्षीरसागर हिने सुरुवातीला राग मारुबिहाग जागू मैं सारी रेन बरमा सादर करत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम तयारी दाखवली.त्यानंतर राम रंगी रंगीले.अवघे गरजे पंढरपूर.बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.सावळा नंदाचा नंदन.मी राधिका आणि शेवटी या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला धनंजय रोंगे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम सुदर्शन कुंभार टाळ माऊली पिसे यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नादब्रह्म कला फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी यामगाचा उद्देश स्पष्ट करत करकंब गावच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून सर्व करकंबकरांनी सदैव तनमनधनानी पाठीशी राहावे असे आवाहन केले.यावेळी करकंब व पंचक्रोशितील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.