जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
जोगेश्वरी येथील नावाजलेले आर्यन्स गोविंदा पथक याला संलग्न असलेले आर्यन्स क्रीडा मंडळ यांच्या वतीने यंदा देखील गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे औचित्य साधून दिनांक - २३ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत निशिकांत कला मंङळ, गणेश मंदिराजवळ, मजासवाडी, समर्थ नगर, जोगेश्वरी -पूर्व याठिकाणी आयोजित केले आहे.तरी विभागातील जागरूक नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आले आहे.