पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील बसस्थानक व परिसरात अस्वच्छता आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांची मोठी कुंचबणा होत आहे. येथील बसस्थानकाची नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने एसटी प्रशासनाच्या विरोधात २१ मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.
तालुका अध्यक्षा राजश्री ताड यांनी तहसीलदार सचिन लंगोटे व आगार प्रमुखांना मागण्यांचे व आंदोलनाचे निवेदन दिले आहे. मागील दिवसांपासून येथील बसस्थानक घाणीचे आगार बनले आहे. सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. घाणीमुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील बसस्थानक परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित आगार प्रमुखांना वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही दखल घेतली जात नाही. एसटी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने २१ मार्चपासून उपोषण केले जाणार आहे. एसटी प्रशासनाने येथील स्वच्छते बाबत तातडीने कार्यवाही करुन स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवावे अन्यथा लोकशाही मागनि उपोषण केले जाईल असा इशाराही दिला आहे.
राजश्री ताड
तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी