भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील यशश्री अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी कृष्णा पिसे हिची नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे.
18 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेत ज्ञानेश्वरीने हे यश संपादन केले आहे. इयत्ता सहावी साठी तिची निवड झाली आहे पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय पोखरपुर येथे तिला इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण मोफत मिळणार आहे. नवोदय विद्यालयात केंद्र सरकार मार्फत सीबीएससी शिक्षण पद्धतीने अभ्यासक्रम राबवला जातो.
ज्ञानेश्वरीने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले आहे त्यामुळे तिचे भाळवणी व पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे. यशश्री अकॅडमी चे संचालक लोखंडे सर व प्रवीण लिंगडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.