पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रमजान ईद ,गुढीपाडवा, रामनवमी अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी व पोलीस पाटील यांची IPS अंजना कृष्णा यांनी बैठक आयोजित केली होती. त्यादरम्यान त्यांनी आगामी साजरे होणारे सर्व सण,उत्सव हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता शांततामय वातावरणामध्ये सण पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
तसेच मौजे कोर्टी तालुका पंढरपूर येथे पंढरपूर ते कराड रोड वर अपघात झाला होता. त्यावेळी येथील युवक महेश येडगे यांनी जखमीना दवाखान्यामध्ये उपचार करिता दाखल करून पोलिसांना मदत केली होती. तसेच पंढरपूर ते म्हसवड रोड वरती धोंडेवाडी फाटा येथे अपघात झाला होता. त्यावेळी धोंडेवाडी येथील राहणारे विष्णू लोखंडे यांनी अपघातातील जखमी लहान मुले यांना दवाखान्यामध्ये दाखल करणे व अपघात करून पळून जाणारे वाहन पाठलाग करून ताब्यात घेण्याकरिता पोलिसांना मदत केली होती.
त्यामुळे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे 1. विष्णू लोखंडे राहणार धोंडेवाडी 2. महेश येडगे राहणार कोर्टी यांचा मृत्युंजय दुत असे प्रमाणपत्र देऊन आयपीएस अंजना कृष्णा मॅडम यांनी सत्कार केला.
यावेळी विविध गावातील शांतता कमिटीचे पदाधिकारी , पोलीस पाटील व पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.