मा.मंत्री सूर्यकांत गवळी कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सव 2025" ठाणे उल्हासनगर संत रविदास महाराज चौक खेमाणी या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
त्या निमित्ताने " संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार " 2025 समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रदान करण्यात आला.
सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कडून संत रविदास महाराज जयंती 2025 य दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील "आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार" 2025 प्रदान करण्यात आला.
पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाअध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांनी गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यचा प्रयत्न करत असल्याने राम हुंडारे यांच्या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संपादक राम हुंडारे यांना "आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार"2025 म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्कचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल मा.सुर्यकांत गवळी मंत्री महाराष्ट्र राज्य ग्राहक कॅबिनेट दर्जा, संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे, प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.