सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दक्षिण सोलापूर येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा लिंबी चिंचोली येथील शिक्षिका सुलोचना भीमाशंकर निकते यांना आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूर येथील नामदेव शिंपी समाजाचे पंच आप्पासाहेब चुंबळकर,सौ नीता चुंबळकर, तेजस, तनिष ,अविनाश गोंदकर,सर्व शिक्षक, नातेवाईक यांचेकडून सुलोचना निकते (पोरे) याचे अभिनंदन केले जात आहे.