सातारा प्रतिनिधी तेज न्यूज -गुरुनाथ तिरपणकर
देव दर्शन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. श्री. शाकंभरी देवी दर्शनाची संधी आपल्याला मिळावी यासाठी कोष्टी व्हीजन ट्रस्ट तर्फे दर्शन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने ट्रस्टच्या वतीने नागेवाडी, जिल्हा.सातारा येथील श्री. शाकंभरी देवी दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम रविवार ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
त्यानुसार सकाळी १०.३० वाजता नागेवाडी (जि.सातारा) येथे श्री. शाकंभरी देवी मंदिर येथे पोहोचयाचे आहे. त्याच मंदिरात सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत भजन सेवा होणार आहे. ११.३० ते १२.०० वाजता देवीची पुजा व आरती होईल. १२ ते १२.१५ या वेळेत उपस्थित मान्यवरांचा कोष्टी व्हीजन ट्रस्टच्यावतीने परिचय करुन देण्यात येईल. १२.१५ ते १२.३० या वेळेत ०५ ते १८ वयोगटातील मुलां मुलींचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. १२.३० ते १.०० वाजेपर्यंत प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी आपले मनोगत व्यक्त करतील. शेवटी दुपारी १.०० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
अधिक माहितीसाठी केव्हीटी चे समन्वयक यांचेशी ९२२६१९६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन टीम केव्हीटी यांचेकडून करण्यात आले आहे.