पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
बाजार डे मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष रामदास नागटिळक यांनी बाजार डे च्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच महादेव गाढवे होते.
प्रारंभी बाजार डे चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तानाजी धुमाळ, ह.भ.प. दत्तात्रय वाघमारे महाराज, प्रगतशील बागायतदार अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नागटिळक म्हणाले की विद्यार्थ्यांना बाजार पेठेतील व्यवहाराची माहिती झाली पाहिजे.व्यवहारातील चलन समजले पाहिजे.बाजारात कोणकोणत्या गोष्टी, वस्तू,मिळतात ते कळले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील.
माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातून भाजीपाला, कांदा, बटाटे, मिरची, पेरू, मेथी, गवार या सह विविध खाद्यपदार्थ आणले होते. बाजार डे पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पालकांनी कौतुक केले.
यावेळी शंकर पिसे, सुरेश राऊत, किरण गुळमे रामचंद्र साळुंखे, सिद्धेश्वर मेटकरी, उदय पवार, राकेश पारधी, बालाजी मोरे, नागेश नांगरे, खंडू लाडे, बंडू शेवाळे, राजेंद्र पासले, किशोर भोईटे यांच्यासह बहुसंख्य पालक शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार किरण गुळमे यांनी मानले