भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंबरी देवीच्या महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे.येथील ग्राम दैवत म्हणून शाकंभरी देवी ओळखली जाते.कर्नाटक राज्यातील बदामी येथील शाकंभरी देवीचे स्थान इथे असल्याचे सांगितले जात आहे.
दरवर्षी पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून शाकंबरी नवरात्राला सुरुवात होऊन पौर्णिमेला हा उत्सव संपन्न होतो. यावर्षी हा नवरात्रोत्सव ७ जानेवारीपासून सुरु होत असून १३ जानेवारीला संपन्न होणार आहे. साधारणपणे हा उत्सव ८ दिवसांचा असतो. मात्र, तिथींमध्ये फेरबदल झाल्यास हा उत्सव कधी ७ किंवा ९ दिवसांपर्यंत देखील साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, देवी शाकंबरी ही आदिशक्ती दुर्गा देवीचे कोमल आणि सौम्य रूप आहे. शाकंबरी देवीला वनशंकरी आणि शताक्षी या नावांनी देखील ओळखले जाते.
शाकंबरी देवीबद्दल अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. यांपैकी एक लोकप्रिय पौराणिक कथेनुसार, शाकंबरी देवीने १०० वर्षांपर्यंत तपश्चर्या केली असून महिन्यातून एकदा शाकाहारी भोजन केले होते. देवीची कीर्ती ऐकून काही ऋषी त्यांच्या दर्शनाला गेले असता देवींनी त्यांचे स्वागत शकाने केले होते. तेव्हापासून देवीला शाकंबरी या नावाने ओळखले जाऊ लागले. स्कंदपुराणानुसार, प्राचीन काळात १०० वर्षांपर्यंत पृथ्वीवर दुष्काळाची स्थिती होती. तेव्हा मनुष्यांचे दुःख पाहून ऋषीमुनींनी देवीची प्रार्थना केली. तेव्हा देवीने आपल्या शरीरातून तयार होणाऱ्या भाज्यांनी जगाचे पोषण केले. अशा प्रकारे देवीने जगातील लोकांना वाचवले होते.धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीला दुष्काळ आणि अन्न संकटातून मुक्त करण्यासाठी, पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीचा अवतार झाला होता. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा देखील म्हटले जाते. शाकंबरी देवीला फळ, भाज्या आणि हिरवी पाने यांची देवी मानले जाते. हेच कारण आहे की देवीच्या सभोवताल फळे आणि भाज्या सजविल्या जातात. शाकंबरी देवीचे शक्तीपीठ हे शिवालिक पर्वतरांगेतील जंगलात नदीच्या काठावर वसलेले आहे.
शाकंबरी नवरात्रीत देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येत भक्त या शक्तीपीठात येतात. मान्यतेनुसार, या नवरात्रीत शाकंबरी देवीची पूजा केल्याने घरात धन-धान्य आणि समृद्धी लाभते. देवीची पूजा करत असताना हिरव्या भाज्या आणि फळे वाहिल्याने देवी प्रसन्न होते.