पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे महीला व बालकल्याण विभाग मंत्री कु. अदिती तटकरे यांनी राजस्थान येथील सुप्रसिद्ध अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यास भेट देऊन फुलांची चादर भेट दिली.यावेळी पंढरपूर येथील समाजसेवक फारुक बागवान उपस्थित होते.अदिती तटकरे या दुसऱ्यावेळी महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाल्या असून त्यांची कारकीर्द यशस्वी होती.
राज्याच्या कल्याणासाठी तटकरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महीला तसेच मुलांसाठी महत्वाच्या योजना राबविल्या,मागील मंत्रिमंडळात देखील त्यांनी माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणुन काम पाहताना वेगळी चुणूक दाखविली,पंढरपूर येथील फारुक बागवान यांनी अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाज दर्गा विषयी धार्मिक महत्व तसेच लोकांनी आलेले विविध सकारात्मक अनुभव याबद्दल महिती दिली, अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाज दर्गा येथे भेट दिल्यावर आपणास खुप आनंद झाला, कार्य करण्याची ऊर्जा, प्रेरणा मिळाली असे महीला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.