पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे स्वरसुधा आणि स्वरसाधना या संस्थेच्या वतीने श्री गणेश रुग्णसेवा संचलित मुकबधीर विद्यालय यांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वरसुधा बहारदार मराठी हिंदी चित्रपट गीत त्यांच्या बहारदार गाण्यांनी पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले
सुरुवातीला मा.आमदार प्रशांतराव परिचारक उमेशजी परिचारक सीमाताई परिचारक, प्रणव परिचारक रा.पा.कटेकर.स्वरसाधनेचे डॉ मिलिंद जोशी व मान्यवर कलाकारांच्या शुभहस्ते उस्ताद झाकीर हुसेन डॉक्टर मनमोहन सिंग मोठे मालक सुधाकरपंत परिचारक व खडके बंधू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दीपप्रज्वलन करून त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमात ख्यातनाम गायिका श्रृती बुजरबरुवा अनुराग गोडबोले.डॉक्टर राम पंडीत यांच्या बहारदार गाण्याने कार्यक्रमाला अधिकाधिक रंगत आली त्यामध्ये सुरुवातीला गणेश वंदना तुझं मागतो मी आता या गाण्याने सुरुवात होऊन जीवा शिवाची बैल जोड बगळ्याची माळ फुले केव्हा तरी पहाटे धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना चुपके चुपके अशा बहारदार हिंदी मराठी चित्रपट गीतांनी कार्यक्रमाला बहर आणली त्यांना तितकीच अनमोल साथ तबला आदित्य ढेकळे कीबोर्ड अभिजित करंजकर.ऑक्टो पॅड मनिष भुवड बासरी सतेज करंदीकर.यांनी अप्रतिम साथ संगत करत पंढरपूरकर कला रसिक सृत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी पंढरपूर आणि पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व कलारसिक मोठ्या संख्येने मुकबधीर विद्यालयाच्या मदतीसाठी प्रवेशिका मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
यापुढील काळात स्वरसुधा आणि स्वरसाधना यांच्या वतीने सांस्कृतिक क्रीडा व सांगितिक कार्यक्रमासाठी निश्चितच पंढरपूरकरांसाठी योगदान लाभेल असे प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी कुलकर्णी यांनी केले आभार रा.पा.कटेकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.