मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र ओळखपत्र, शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राम हुंडारे हे सारा न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्यामुळे त्यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
राम हुंडारे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या 2025 "सोलापूर जिल्हा अध्यक्ष" पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे निवृत्त ACP अरुण कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र,ओळखपत्र,शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व संपादक भारतीय दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष अंबादास शिंदे, जेष्ठ विधीतज्ञ संजीव सदाफुले, निवृत्त ACP अरुण कदम, डॉ कीर्तीपाल गायकवाड, कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज), प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती यशवंत पवार यांची उपस्थिती होती.
राम हुंडारे यांचा परिचय -
राम हुंडारे हे सारा न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्यांचा पत्रकारिता मध्ये दांडगा अभ्यास असून महाराष्ट्र राज्यात सारा न्यूजचे अनेक पत्रकार आहेत. राम हुंडारे यांनी सोलापूरातील सर्वसामान्य माणसांच्या तसेच वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या सारा न्यूज नेटवर्क या न्यूज पोर्टल माध्यमातून सरकारी पातळीवर आवाज उठवला आहे. जनसामान्य माणसांचा आवाज म्हणून सारा न्यूज चा प्रशासनात चांगलाच दबदबा असून धारदार लेखणी साडेतोड बातमीच्या माध्यमातून सारा न्यूज ने राज्यात आगळा वेगळा वाचक वर्ग निर्माण केला आहे. राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सारा न्यूजने वेगळाच ठसा उमटवला आहे.
या कार्यक्रमास सोलापुरातील अनेक संपादक व पत्रकार बांधव सहभागी झाले होते.