मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल येथे मकर संक्रांती निमित्त इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी पतंग बनविणे स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
यावेळी चौथीच्या वर्ग शिक्षिका सिंथिया डिमेलो, मीनल कुटिन्हो, डीप्सिना डिसोझा, रिंकल गोंसलवीस यांनी मुलांना मार्गदर्शन केले.साधारण दोनशे विद्यार्थ्यानी पतंग बनविण्याचा आनंद घेतला.तसेच घरून आणलेले तिळगुळ आणि लाडू एकमेकांना देत संक्रांत सणाच्या शुभेच्छा दिल्या.या शाळेत नेहमीच मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि विविध सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यासाठी शिक्षक वर्ग कायमच मुख्याध्यापक फादर निकी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत असतो.
मुलांनी बनविलेले पतंग पाहून त्यांचे पालक देखील आनंदित झाले.आकर्षक पतंग बनविणाऱ्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.