पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी मतदान प्रतिज्ञा घेतली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलास करांडे यांनी दिली
त्याचवेळी सर्व शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत मतदानाचा अधिकार आणि त्याच्या महत्त्वाची प्रगल्भता मान्य केली. शिक्षकांनी एकत्र येऊन प्रतिज्ञा घेतली, "आम्ही मतदान करणार आहोत, आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचे महत्त्व सांगणार आहोत," असे ठरवले.
या कार्यक्रमाद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आणि त्यांच्या कर्तव्यातून समाजाला योगदान देण्याचे संदेश दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा चंद्रकांत देशमुख, प्रा गुरुराज इनामदार, प्रा अजित करांडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले