सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
इस्रो प्रमुख चांद्रयान व मंगळयान चे प्रमुख सोमनाथजी यांना दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे आयोजित प्रकृर्ती संवाद कार्यक्रम मध्ये अस्सल सोलापुरी हुरडा,ज्वारी भाकरी भेट देऊन सत्कार केले,ड्रीम फौंडेशन तर्फे शेतकऱ्यांनी तयार केलेले
सोलापुरी भाकरी व हुरडा भविष्यात अवकाश मोहिमेत जाणाऱ्या शास्त्रज्ञ व अवकाश यात्रीसाठी देता येतील का यावर चर्चा व संवाद झाले,सोमनाथ जी हुरडा आणि कडक भाकरी शेंगा चटणी आस्वाद घेतले व कौतुक करून या वर नक्की विचार करू आणि सोलापूर भेटी देणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रम राज्यसभा उपसभापती श्री हरिवंश नारायण सिंह,कार्यक्रम अध्यक्ष भारत विकास संगमचे श्री के,एन,गोविंदाचार्य, ट्री मन राजस्थान पद्मश्री हिम्मतराम, सोलार मॅन चेतन सिंग सोळंखी,पद्मश्री उमाशंकर पांडे यांच्यासह विविध राज्यातील मान्यवर जे पर्यावरण आणि शाश्वत विकास यावर काम करणारे मान्यवर उपस्थित होते.
संयोजक अजित तिवारी यांनी स्वागत केले या कार्यक्रमात 75 मान्यवरांचा ड्रीम फौंडेशन तर्फे सन्मान करण्यात आले सोलापुरी जगात भारी.चला सोलापूर चे जागतिक ब्रँडिंग करू या असे मत काशिनाथ भतगुनकी मो 7219099955 यांनी व्यक्त केले आहे.