पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
पंढरपूर तहसील आवारातील दुय्यम निबंधक कार्यालय अर्थात खरेदी विक्री चे ठिकाण परंतु या ठिकाणाला पाहिल तेव्हा एखाद्या बाजाराचे स्वरूप आल्याचे या कार्यालयाचे दारात प्रत्येक वेळा दिसून येते.
त्यामुळे कोण खरेदीला आला की विक्रीला आला हे समजून येत नाही अशातच दस्तलेखनित साक्षीदार ओळख यांचीही गर्दी कायम असते.या गर्दीत महिलाना आत जाता ही येत नाही की बाहेर पडता येत नाही.यावेळी साधे सौजन्यही दाखवायची स्थिती नसल्याने या कार्यालयाला बाजाराचे स्वरूप येथे असे म्हणण्यास घरी ठरणार नाही.
दुय्यम निबंधक कार्यालयात सतत जमिनीचे प्लॉट विक्री खरेदी गहाणखत कामासाठी नागरिकांची व काही वेळा महिलांची ही या कार्यालयात वर्दळ असते परंतु या कार्यालयात शिस्तीचा अभाव असल्याने दारातच आलेल्या सर्वांची गर्दी असते त्यामुळे एखाद्या महिलेचे खरेदी विक्रीचे दस्तावर सही करण्यासाठी जाणे कठीण होऊन बसते परंतु तेथील ना कर्मचाऱ्यांना खेद ना अधिकाऱ्यांना खंत अशी अवस्था या कार्यालयाच्या असून आलेले सर्वजण समोरच्या अधिकाऱ्यासमोरच गर्दी करतात यामुळे या ऑफिसला शिस्तच उरली नाही असे म्हणल्यास गैर ठरणार नाही.
त्यामुळे काही वेळा आलेल्या महिला भगिनींची मला होते हे सुद्धा तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही हे सर्वात मोठे दुर्दैव आहे दस्त खरेदीसाठी आलेल्या लोकांना शिस्त लागण्याची गरज असून दुय्यम निबंध कार्यालयाच्या दारातच सतत व समोरची गर्दी असते हे वरील चित्रावरून स्पष्ट दिसते याकरता या कार्यालयाला सततच बाजाराचे रूप आल्यासारखे दिसून येते त्यामुळे कोणाचा मेळ कोणाला लागत नाही याकरता येणाऱ्याला शिस्त लावणे गरजेचे आहे असे वाटते.