पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसंतदादा प्रतिष्ठानचे सदस्य मा.राजसिंह माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आय.टि.आय.चे प्राचार्य संतोष गुळवे यांनी भुषविले,
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणं केली, तसेच अध्यक्ष माने यांनी भाषणात सांगितले की प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाचा अभिमान बाळगुन,आपले हक्क,कर्तव्य बजावुन देश हीतासाठी युवकांनी योगदान दिले पाहिजे.
यावेळी आय.टी.आय.चे निदेशक स्टाफ, नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निदेशक अनिल ननवरे यांनी केले,