मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज पूनम पाटगावे
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पत्रकार गणेश हिरवे हे त्यांचा ५१ वा वाढदिवस दृष्टीहीन लोकांना किराणा किट देऊन २७ जानेवारी रोजी असणारा त्यांच्या वाढदिवस त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी रोजी साजरा केला.
एक आघाडीचे समाजसेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गणेश हिरवे सर्वांनाच परिचित असून त्यांचे सामजिक कार्य अविरतपणे वर्षाचे बाराही महिने सुरूच असते.गेल्या वर्षी देखील त्यांनी आपला ५० वा वाढदिवस मीरारोड स्थित वृद्धाश्रमात साजरा करून सामाजिक दायित्व जपले होते.यंदाही त्यांनी दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना किराणा किट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
एक प्रेरणादायी, हसतमुख आणि कायमच समाजातील गोर गरीब वंचित यांच्यासाठी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून हिरवे यांची ख्याती आहे.वाटप करण्यासाठी त्यांचे मित्र प्रफुल लोखंडे हे देखील उपस्थित होते.