प.पूज्य दंडवते महाराज यांच्या स्वयंभू पादुकांचे स्वागत करत विधिवत पूजा संपन्न
हा कार्यक्रम चालू असतानाच उस्ताद झाकीर हुसेन यांचे दुःखद निधन झाले बातमी समजली सर्व कलाकार आणि रसिकांनी श्रध्दांजली अर्पण केली
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्ताने केदारनाथ रेसीडंन्सी येथे दत्त उपासक श्री माधवकाका कुलकर्णी.विलास कुलकर्णी यांचे निवासस्थानी श्री दंडवते महाराज यांच्या स्वयंभू पादुकांचे विधीवत मंत्रोच्चारात पूजन आणि आरती संपन्न झाली.त्याआधी पादुकांचे वाजतगाजत आगमन झाले अनेक महिलांनी पादुकांचे औक्षण करत पुष्पांचा वर्षाव केला.त्यानंतर योगीराज बाबा दंडवते महाराज यांच्या उपस्थितीत ख्यातनाम गायक पं.संजय गरुड यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये पं.संजय गरूड यांनी आपल्या दमदार आवाजाने वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी गजराने सुरुवात करत रुप पाहता लोचनी.विठोबा रखुमाई.काया नहीं तेरी नही तेरी.कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात.भैय्या गाडीवाला गाडी दिले हाक रे. एक राधा एक मिरा.शेवटी दिगंबरा दिगंबरा प्रभू दिगंबरा या भैरवी ने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला झंकार कुलकर्णी नितीन दिवाकर.हार्मोनियम विलास कुलकर्णी.पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ जोशी काका स्वरसाज रुपक कुलकर्णी आणि सुंदर निरुपण डॉ.विजय जगताप महाराज यांनी करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रम चालू असतानाच याचवेळी अतिशय दुःखद बातमी उस्ताद झाकीर हुसेन यांचे दुःखद निधन झाले समजली त्यावेळी सर्वांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.त्यानंतर सर्व कलाकार मंडळींचा सत्कार योगीराज बाबा दंडवते महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदारनाथ रेसीडंन्सी येथील सर्व रहिवाशी यांनी अधिक परिश्रम घेतले.