मुंबई प्रतिनिधी पूनम पाटगावे तेज न्यूज
कुर्ला पूर्व पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय येथील शिक्षिका योगिता हिरवे, कुर्ला गांधी बाल मंदिर शाळेचे शिक्षक विश्वनाथ पांचाळ आणि बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता चौगुले यांना नुकताच प्रेरणा फाऊंडेशन चे वतीने आदर्श शिक्षिका, आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या तिघांची कामे समाजासाठी विधायक असून त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन आम्ही त्यांना पुरस्कार सुपूर्द केल्याचे प्रेरणा फाऊंडेशन च्या अध्यक्ष प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी सांगितले.पुरस्कार मिळाल्याने या तिघा मान्यवरांचे अनेकांनी कौतुक केलं आहे.यावेळी विविध क्षेत्रातील जवळपास शंभरहून अधिक जणांना पुरस्कार देण्यात आले.