मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
बोरिवली पश्चिम येथे अभिनव विद्यामंदिर माध्यमिक शाळेस आर पूर्व शिक्षक विभाग विज्ञान प्रदर्शन आयोजित सहशालेय स्पर्धेतील निसर्ग मंडळ या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.सदर स्पर्धेमध्ये ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.काळाची गरज लक्षात घेता इंधन बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कागद पुनर्वापर असे उपक्रम यात समाविष्ट होते. या साठी परीक्षक म्हणून गार्गी गिध आणि रश्मी जोशी यांनी काम पाहिले.
अभिनव शाळेचे शिक्षकवृंद काशिनाथ नाईक, रामचंद्र गावडे, संतोष संखे, महेश कुमार वसावे, ऋता नांगे, संजीवनी देवकर, शिवाली शिंदे, तेजस्वी निवाते आणि शिवाली राऊत यांनी वर्षभर यासाठी नवनवीन उपक्रम राबवून मेहनत घेतली. ज्यांच्या संकल्पनेतून हे मंडळ स्थापन झाले त्या म्हणजे अभिनव च्या मुख्याध्यापिका प्राची वालकर यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले,पालकांनीही यावेळी आनंद व्यक्त केला.वर्षभर या शाळेत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल असते.