मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
26 नोव्हेंबर संविधान दिन दरवर्षी साजरा केला जातो यावर्षी गांधी मंदिर हायस्कूल कुर्ला या ठिकाणी संविधान दिन व मुंबई हल्लात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तिमिरातून तेजाकडे या संस्थेचे प्रमुख सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षांवर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
रेडकर सरांनी सर्व सरकारी स्पर्धा परीक्षा याची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना गमतीशीर पद्धतीने समजावून सांगितली यावेळी इयत्ता आठवी नववी दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. स्पर्धा परीक्षेत पुढे आम्ही यशस्वी होऊ असे वचनही त्यांनी रेडकर सरांना दिले.
सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, पर्यवेक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक श्री अनिल पांचाळ सर यांनी केला .