करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
औंदुबर आबा आणि परिवार यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ८ डिसेंबर रोजी चवदार.आणि तितकीच झणझणीत बाजार आमटीच भोजन समस्त करकंब करांना दिलं जातं त्याला करकंबकर ही मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रेमाच्या बाजार आमटीला भरभरून प्रतिसाद देत असतात.
संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या या इन्स्टंट बाजार आमटीच्या पॉकेट मधून बाजार आमटी घराघरापर्यंत पोहचवली असून करकंब नगरीच नाव बाजार आमटी साठी प्रसिद्ध केलं आहे याचा आम्हां करकंब करांना सार्थ अभिमान वाटतो.काल सुमारे 3 हजार लोकांनी या बाजार आमटीचा आस्वाद घेत आमदार प्रशांत मालक यांनीही उपस्थित राहून बाजार आमटीचा आस्वाद घेत या उद्योगाला शुभेच्छा दिल्या.
कुंभार उद्योग समूहाने इन्स्टंट बाजार आमटीची पाकीट ही विक्री साठी उपलब्ध केली असून नक्कीच आपल्या परगावी राहणाऱ्या मित्रांना.नातलगां ् पर्यंत ह्या झणझणीत बाजार आमटीची चव पोहचवा संपर्क औंदुबर कुंभार 9527211212 साधावा.
करकंब येथील बाजार आमटीची लोकप्रियता वाढत आहे. या आमटीच्या अनोख्या चवीला सोलापूरसह राज्यातील खवय्यांची भरभरून दाद मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही करकंब येथील औदुंबर कुंभार यांनी ८/१२ दिवसाचे औचित्य गाव जेवण दिले होते. ८०० लिटर बाजार आमटीचा मस्त आस्वाद घेत संपूर्ण गावांतील ३ हजारपेक्षा जास्त लोकांनी भोजन केले.
करकंब येथे गेल्या २० वर्षांपासून औदुंबर कुंभार हे ८ / १२ चे (८ डिसेंबर) औचित्य साधून गाव भोजनाचा उपक्रम राबवितात. यंदा या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस आल्याने अनेकजण बाजार आमटी चा आस्वाद घेण्यासाठी सज्ज होते. सकाळी ११ वाजल्यापासून भोजनास सुरुवात झाली, ग्रामस्थ सवड मिळेल त्यानुसार येत होते. तर काही मित्र-मंडळी मिळून येताना दिसत होते. आमटी बरोबरच चपाती, कांदा, लिंबू, शेंगदाणे असा बेत होता. जवळपास ८०० लिटर बाजार आमटी बनविण्यात आल्याचे अशोक कुंभार यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून व्यापारी, शेतकरी, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी याचा लाभ घेतला आहे. सायंकाळी ६ पर्यंत जेवणाची पंगत बसली होती.
संपूर्ण महाराष्ट्रात मागणी
गेल्या वीस वर्षांपासून बाजार आमटीचा गाव जेवणाचा उपक्रम चालू आहे. सर्व क्षेत्रातील लोक याचा आस्वाद घेतात. गेल्या ८ महिन्यांपूर्वी कुंभार बंधूंची बाजार आमटी हा बॅण्ड बाजारात विक्रीसाठी आणला असून त्यास संपूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. सध्या बाजार आमटीची नवनवीन उत्पादने (पॅकिंग) बाजारात उपलब्ध असले तरी आपल्या उत्पादनाला खब्यांची जास्त मागणी आहे.
औदुंबर कुंभार, करकंब