पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वयत्त महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. ही स्पर्धा व्ही.जी शिवदारे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सोलापूर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठातील एकूण 14 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या चार विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
आणि त्या चार ही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
61 किलो वजनी गटात सृष्टी पवार बीए भाग तीन हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे तिचे चेन्नई येथे होणाऱ्या ऑल इंडिया वेस्ट झोन कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 किलो वजन गटात रितेश शिंदे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. , 55 किलो वजन गटात अतुल चव्हाण याने तृतीय क्रमांक प्राप्त केला., 55 किलो वजन गटात आदित्य चव्हाण याने चौथा क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन. प्राचार्य डॉ.सी. जे खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईक नवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे . शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले या सर्वांचे मार्गदर्शन लाभले .