पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बलभीम राजाराम पावले व व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत धर्मांन्ना कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन पृथ्वीराज राऊत व व्हाईस चेअरमन पांडुरंग कोले यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने सदरची निवड प्रक्रिया घेण्यात आली. रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या दर्शन मंडप येथील कार्यालयात निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थेचे पी बी सावंत यांनी कामकाज पाहिले. चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने सदरची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यावेळी पतसंस्थेचे संचालक विनोद पाटील, पृथ्वीराज राऊत, पांडुरंग कोले, पांडुरंग बुरांडे, सुनंदा देवकते, बलभीम पावले, चंद्रकांत कोळी, नारायण देवकुळे, राजेंद्र सुभेदार, मंदा मिसाळ, तुकाराम कुलकर्णी, सविता रणदिवे, सचिव सुशिलकुमार ढेकळे पाटील, लिपिक सुरज तेली उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी अभिनंदन केले. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने पार पाडीन अशी ग्वाही चेअरमन बलभीम पावले यांनी दिली.