पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्यनेश्वर विष्णू जोशी या भाविकांने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
देणगीदाराचा श्रीचे उपरणे व प्रतिमा देऊन मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.
जोशी हे कर्वेनगर, पुणे येथील रहिवासी आहेत व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून, ते नेहमी श्रींच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. आज ते श्रींच्या दर्शनासाठी व नित्यपूजेसाठी आले असता, त्यांनी मंदिर समितीच्या अन्नछत्रात अन्नदानासाठी सदरची देणगी दिली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे संत तुकाराम भवन येथे अन्नछत्र असून, या अन्नछत्रांमध्ये अन्नदान करण्यासाठी रक्कम रुपये 7 हजार पासून पुढे देणगी दिल्यास इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येते. त्यासाठी "अन्नछत्र सहभाग योजना" आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संत तुकाराम भवन येथील कार्यालयात संपर्क साधावा असे यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.