सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
*परसबाग सोलापूर* आणि **देशी वृक्ष संवर्धन, सोलापूर* यांच्यावतीने सोलापूर शहरवासियांसाठी देशी झाडांच्या संवर्धन आणि संरक्षण हेतुनें लोक सहभागातून दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत "*झाडाची भाऊबीज*" हे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
देशी वृक्ष हे पर्यावरण संवर्धनात महत्वाची भुमिका बजावतात.त्यांचे औषधी उपयोगही असतातच. सध्या सोलापूर शहरामध्ये शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देशी वृक्षांचे प्रमाण अतिअल्प आहे. विदेशी आणि शोभेच्या वृक्षांचे प्रमाण मात्र वाढते आहे.मोठ्या दिर्घायुषी देशी झाडांचे संवर्धन, संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.त्यासाठी जनजागृती हाच एकमेव उपाय आहे.
याकामी लोकसहभाग वाढायला हवा. या संदर्भात जन जागृती व्हावी या हेतुनें " *झाडाची भाऊबीज* " हा उपक्रम *परसबाग सोलापूर* आणि *देशी वृक्ष संवर्धन, सोलापूर* यांनी हाती घेतला आहे.
सोलापूर शहरातील देशी वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी,बाग प्रेमी नागरिक, संस्था ,शाळा,महाविद्यालये,संघटना, आस्थापना,महिला मंडळे,समाज माध्यमातील विविध समुह, जेष्ठ नागरिक संघटना ,सोसायट्या,गृह संकुले यांनी व्यक्तीगत अथवा सामुहिक स्वरुपात स्वत:हून एकत्र येऊन आपल्या नजिकच्या परिसरातील "*देशी झाडाला भाऊबीजेचं विधीवत औक्षण*" करुन आश्वासित करायचे आहे .त्याचे आशयगर्भ असे तीन फोटो आणि एक व्हिडिओ काढुन 9960008220 यावर फक्त WhatsApp message द्वारे दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवायचा आहे.सोबत आपलं, संपुर्ण नाव,झाडाचे ठिकाण, WhatsApp number, एरियाचे नाव नमुद करणे आवश्यक आहे.
हे अभियान सध्या फक्त सोलापूर शहरासाठी आहे. औक्षणासाठी झाड देशीच पण मोठे अपेक्षित आहे.काटेरी झाडे वर्ज्य नाहीत.झाड झुडुप वर्गीय नसावे.तथापि ते कुंडीत किंवा ड्रममध्येही नसावे.औक्षण करताना झाडा भोवतीची जागा स्वच्छ केलेली असावी. झाडाला नैसर्गिक फुलांचा हार घातलेला असावा.झाडाचे औक्षण पारंपारिक पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.सर्व वयोगटातील महिला-पुरूष, युवक-युवती, मुले-मुलींची उपस्थिती जास्तीत जास्त असावी. तसेच झाडाला *आम्ही तुझे संवर्धन आणि संरक्षण करु* असे अभिवचन देऊन आश्वस्त करणे आवश्यक आहे.फोटो,व्हिडिओतून हे सारे स्पष्ट होईल याची काळजी घ्यावी.
दि.१५ नोव्हेंबर पर्यंत चालणा-या या *झाडाची भाऊबीज* अभियानात सर्वोत्कृष्ट पाच औक्षण कार्यक्रमांची निवड करण्यात येणार आहे.तथापि सर्व सहभागींना परसबाग सोलापूरच्यावतीनें सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तरी सोलापूर शहरातील पर्यावरण प्रेमी,देशी वृक्ष प्रेमी नागरिकांनी या अभियानात स्वतःहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन परसबाग सोलापूर आणि देशी वृक्ष संवर्धन, सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
नारायण पाटील
संस्थापक
परसबाग सोलापूर
देशी वृक्ष संवर्धन, सोलापूर
9960008220
Only WhatsApp message