सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद आमदार निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार राजन पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी ,आमदार बाबासाहेब देशमुख, मा. आमदार शहाजी बापू पाटील, मा. आमदार राम सातपुते, मा. आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, मा.आमदार दिलीप भाऊ माने, मा. सभापती रणजीतसिंह शिंदे, सोलापूर भाजप शहराध्यक्ष नगरसेवक रोहिणीताई तळवळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गोरे म्हणाले की,कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि अभूतपूर्व उपस्थितीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा कार्यक्रम भाजपच्या संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला. पक्षाने राजेंद्र राऊत यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. विकासाभिमुख विचार आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर आपण सर्वजण मिळून विजयाचा हा निर्धार पूर्णत्वास नेऊ.असा संकल्प गोरे यांनी व्यक्त केला.


