सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहर मध्ये चे महाराष्ट्रातील सर्वात उच्चशिक्षित उमेदवार अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप शंकराव आडके यांना संभाजी ब्रिगेड पार्टी यांचे अध्यक्ष अँड .मनोज आखरे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे.आपण शिव -फुले -शाहू -आंबेडकर विचारधारा समाजामध्ये रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा विचार झालेला अभिप्रेत असलेले पुरोगामीत्वाचा व विकासाच्या समविचारी विचारधारेसाठी कार्यरत आहात. ही विचारधारा, कार्य सातत्यपूर्णरित्या समाजाला न्याय देण्यासाठी समाजातील विषमता दूर करून मराठ्यांच्या ओबीसी मध्ये समावेश, ओबीसीचे आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण ,शैक्षणिक धोरण, जुनी पेन्शन ,आरोग्य धोरण, शेतकरी- कष्टकरी, शिक्षक विद्यार्थी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात प्रामाणिक प्रयत्न करून विधान भवनात वेळोवेळी यासाठी आवाज उठवाल या विश्वासासह संभाजी ब्रिगेड तर्फे आपणास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे अशा आशयाचे पत्र त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी दिले. सोबत इंद्रजीत मोरे ,पदाधिकारी व भगवा शेला ग्रुप, बाळे यांचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सावंत हे उपस्थित होते.
डॉ. संदीप आडके यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू केलेली आहे. तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील इतर बाबींमध्ये संविधानासनुसार सोयी ,योजना व आरक्षण देऊन प्रत्येक जाती धर्माच्या सोलापूरकरांस अस्मितेने जगण्याचे सूराज्य देण्यास प्राधान्य देणार असल्याचे नमूद केल्यामुळे,तसेच त्यांनी आपल्या वैद्यकीय व सामाजिक कार्यातून हे सर्व जाती-धर्मांच्या समस्या आग्रहाने मांडल्या आहेत.सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे व या पाठिंब्यामुळे सोलापूर मध्य मधील त्यांना सर्व धर्मीयांची भरगोस मते पडतील. संभाजी ब्रिगेड पक्षास जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत.