पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकत्याच गुजरात येथील नांदीयाड येथे पार पडलेल्या ऑल इंडिया आर्चरी स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये रीकर्व विभागात संभाजी शिंदे याने गोल्ड मेडल मिळवले. ऑल इंडियातून जवळपास 300 पेक्षा जास्त स्पर्धक प्रत्येक राज्यातून गुजरात येथे उपस्थित होते. या स्पर्धा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक कल्याण यांच्यावतीने घेण्यात आल्या होत्या .
या स्पर्धा अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या होत्या. या स्पर्धेमध्ये कृष्णा संभाजी शिंदे यांने आपल्या यशस्वी कारकीर्दीचा झेंडा संपूर्ण भारतभर रवला .या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक आरसीसी लातूरचे शिवराज मोटेगावकर सर यांनी अभिनंदन केले .नेहमीच विविध खेळांमध्ये आपले विद्यार्थी कसे चमकतील यासाठी प्रयत्नशील असणारे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी कृष्णा शिंदे याचे अभिनंदन केले .कोच म्हणून सागर सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी वाटचाली बद्दल सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, दीपक देशमुख ,वर्षाराणी मोरे, शितल बागल ,लीना बागल ,शीतल मस्के ,फरहद पटेल, सीमा रकटे ,अजय मोरे, सोमनाथ भुईटे व गादेगाव ग्रामस्थांच्या वतीने कृष्णा शिंदेचे अभिनंदन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातून कृष्णा शिंदे हा ऑल इंडिया मध्ये गोल्ड मेडल घेणारा हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.