पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षीप्रमाणे स्व.प्रा. उमेशचंद्र खेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे" आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या स्पर्धेपैकी एक आहे, हे आपण सर्व जाणताच...तरी सर्वांनी आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
स्व.प्रा.उमेशचंद्र खेडकर मित्र मंडळ,पंढरपूर.स्पर्धा दिनांक 08/12/ 24 सकाळी :-09.30 वा.स्थळ:-द.ह.कवठेकर प्रशाला, पंढरपूर
टीप:- स्पर्धा "फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी" मर्यादित आहे.
स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती व संपर्कासाठी पत्रक सोबत जोडलेले आहे.सर्व मित्र मंडळ व सहकाऱ्यांनी सदर स्पर्धेचे पत्रक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.