करमाळा प्रतिनिधी तेज न्यूज
करमाळा शहरातील दोन रुग्णांना प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक घेऊन सहा महिन्याच्या पूर्ण कालावधीसाठी निक्षय मित्र या नात्याने पोषण आहाराचे संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. गुंजकर बोलताना म्हणाले की संस्थेने रुग्णालयातील रुग्णांना पोषण आहार वाटप केल्याबद्दल आभार मानतो व पुढील सामाजिक कार्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सदैव आपल्याला सहकार्य करू तसेच या पोषण आहार किती साठी सद्गुरू कृपा फर्निचर चे मालक गणेश तळेकर व प्रशांत पाटुळे यांनी सहकार्य केले.
यावेळी श्रीहरी ढावरे , अलीम शेख नरेंद्र ठाकूर शिवनाथ घोलप डॉ. राऊत ए. टी.एस चव्हाण ए .टी. एल. एस. विभूते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर श्रीहरी ढावरे यांनी मांडले.