सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नीलगार उमेदवार डॉ.संदीप शंकरराव आडके यांनी आज पूर्व विभागातील नीलगार इस्टेट येथे जाऊन कालिका देवीचे आशीर्वाद घेतले. तसेच सुशिक्षित मतदारांचा वाढता कौल मिळत असून नागरिक,महिला डॉ.आडके यांचा प्रचार घरोघरी जाऊन करीत आहेत.
डॉ. संदीप आडके हे महाराष्ट्रातील उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांच्या वचननाम्याप्रमाणे सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे पहिलेच वचन त्यांनी पूर्ण केलेले आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ते गेली अनेक वर्षे झटत आहेत व त्यामुळे त्यांनी सोलापूर शहर मध्य मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे.
त्यांनी निरपेक्ष भावनेने वैद्यकीय सेवा व समाजकार्य केल्यामुळे सोलापुरातील सर्वच जाती-धर्माच्या व सर्व स्तरातील लोकांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे.