सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरची विमान सेवा ही फक्त आणि फक्त सोलापूर विचार मंचच्या प्रयत्नांमुळे सुरू होत आहे. सोलापूर विमान सेवेचे वृत्त चुकीचे,फेक न्यूज असल्याचे सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके यांनी सांगितले आहे.
यावेळी डॉ.आडके म्हणाले की,त्यामध्ये भारतीय जनता पक्ष अथवा इतर कोणाचा एक टक्क्याचा सहभाग नाही. जर कोणी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी व चिमणी पाडण्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्यांनी काय केले हे सिद्ध करावे हे माझे ओपन चॅलेंज आहे निवडणुकीमध्ये दुसऱ्याने केलेल्या कामाचे फुकट श्रेय लाटण्याचा हा भारतातील सत्याधारी पक्षाचा, सोलापुरातील एका निष्क्रिय ग्रुपच्या माध्यमातून फेक न्यूज पसरून दोघांनीही केलेला हा अत्यंत केविलवाला प्रयत्न आहे. ज्याला विमानतळ प्रशासनानेच तात्काळ सडेतोड उत्तर दिलेले आहे.
यावेळी डॉ.आडके म्हणाले की ,Fly 91 airlines गोवा यांचे मालक मनोज चाको यांना मी हे लिहिलेले पत्र आहे व आजपर्यंत त्यांनी मला सोलापूरच्या विमान सेवा सुरू होण्याबद्दल कोणतेही उत्तर दिलेले नाही.