पिंपरी चिंचवड प्रतिनिधी तेज न्यूज
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित शुक्रवार दि. १५.११.२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. पर्यावरण पूरक असा दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे ,तरी पिंपरी-चिंचवड , इंद्रायणीनगर, संतनगर परिसरातील नागरिकांनी हजर राहून एक दिप पर्यावरणासाठी या उपक्रमात स्वंयस्फुर्तीने सहभागी व्हावे, ही विनंती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांकरिता संतनगर व इंद्रायणीनगर मधील सर्व नागरिक व स्पाईन रोड सर्कल येथे रोज सकाळी संध्याकाळी येणारे सर्व नागरिक, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, परिसरातील सामाजिक संस्था मंडळे व सर्व गृहसोसायटी संस्था यांच्या वतीने स्थळ स्पाईन रोड, गोल सर्कल (डिस्ट्रिक्ट सेंटर), MIDC पोलीस स्टेशन शेजारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजक संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाउंडेशन संतनगर, मोशी-प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड,पुणे,महाराष्ट्र,भारत,भुमाता वसुंधरा यांनी केलेले आहे.